मुक्त अभिव्यक्तीची रक्षा करा आणि ओपन सोर्स गोपनीयता तंत्रज्ञानाच्या माध्यमाने सुरक्षित वैश्विक संप्रेषण सक्षम करा.
Signal Messenger या आमच्या ध्वजवाहक उत्पादनासह, वापरकर्त्या्च्या गोपनीयतेचा पुरस्कार करणे म्हणजे आमच्या मते आपल्या डेटाचे "जबाबदारीने" व्यवस्थापन करण्याऐवजी आपला डेटा कोणाच्याही, अगदी आपल्याही हाताबाहेर ठेवणे होय.
मुक्त स्त्रोत समुदायाचे वचनबध्द सदस्य या नात्याने, आमचे तंत्रज्ञान आम्ही प्रकाशित करतो आणि त्यांच्या स्वत:च्या उत्पादनात आणि सेवांत त्याचा अंगीकार करण्यासाठी इतर कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ज्ञान शेअर करतो.
Signal Foundation ही 501c3 विनालाभ संस्था आहे. आम्हाला या पदाचा अभिमान आहे आणि एक विनालाभ संस्था, लाभाच्या उद्दिष्टाने प्रेरित कोणत्याही व्यवसायाइतकीच नवसंशोधन करू शकते व मोठी होऊ शकते हे सिध्द करण्यास आम्ही कटिबध्द आहोत.
Signal फाउंडेशन ही 2018 मध्ये 2012 मध्ये उदयास आलेल्या Signal मेसेंजरला सपोर्ट करण्यास स्थापित करण्यात आली. फाऊंडेशनच्या माध्यमातून, आम्ही Signal च्या वाढीला आणि चालू कार्ये त्याचप्रमाणे खाजगी दळणवळणाच्या भविष्याला अन्वेषित करण्याला सपोर्ट करत आहोत.
Signal ही कोणतेही जाहिरातदार किंवा गुंतवणूकदार नसलेली ना-नफा संस्था आहे, जी तिचा वापर करणार्या आणि तिचे मूल्य जाणत असलेल्ताया लोकांमुळे टिकून राहिलेली आहे.
आम्ही Signal Messenger चे पालक या नात्याने Signal Foundation ची रचना केली कारण त्याच उद्दिष्टांस प्रोत्साहन देणार्या इतर गोपनीयता संवर्धन प्रकल्पांना एक दिवस प्रोत्साहन देण्याची आकांक्षा बाळगतो.
जगभरातील लाखो लोकांना Signal Messenger एक नि:शुल्क ॲप म्हणून वितरित करण्यासाठी आम्ही समाजाच्या पाठिंब्यावर अवलंबून राहतो. आपण या उद्दिष्टासास पाठिंबा द्याल का?
अंबा काक ह्या, सरकारी नियामक, उद्योग, नागरी समाज संस्था आणि परोपकारांना सल्ला देणार्या एका दशकाहून अधिक आंंतर-राष्ट्रीय कौशल्यासह असलेल्या, एक वकील आणि तंत्रज्ञान धोरण तज्ञ आहेत. त्या सध्या न्यूयॉर्क मधील एक अग्रगण्य धोरण संशोधन संस्था, AI Now च्या कार्यकारी संचालक आहेत, आणि नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी येथील सायबरसुरक्षितता आणि गोपनीयता संस्था येथे वरिष्ठ फेलो आहेत.
अंबा यांनी यु.एस. फेडरल ट्रेड कमिशन येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले आहे जिथे त्यांनी उत्क्रांत होणार्या तंत्रज्ञानाच्या समस्यांवर नियंत्रक म्हणून सल्ला दिला होता. AI Now च्या पूर्वी, अंबा या Mozilla येथे वैश्विक धोरण सल्लागार होत्या जिथे त्यांनी आशिया-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलिकडील डेटा गोपनीयता कायदा आणि नेटवर्क न्युट्राॅलिटी या सारख्या समस्यांवर काम करून विकास केला आणि संस्थेतील पदावर पुढे गेल्या. सध्या त्या Mozilla फाऊंडेशन येथे संचालक मंडळाच्या प्रोग्राम कमिटीवर आहेत. अंबा यांनी भारतातील ज्युडिशिअल सायन्सेसच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमधून बीए एलएलबी (ऑनर्स) प्राप्त केली आहे. त्यांनी मास्टर्स इन लॉ (बीसीएल) आणि युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथून सोशल सायन्स ऑफ इंटरनेट मध्ये एमएससी केले, जिथे त्या ऱ्होर्ड स्स्कॉलर म्हणून उपस्थित होत्या.
ब्रायन ॲक्टन हे उद्योजक व संगणक प्रोग्रॅमर आहेत ज्यांनी 2009 साली WhatsApp या संदेश ॲपची सह-संस्थापना केली. हे ॲप 2014 साली Facebook ला विकल्यानंतर, ग्राहकाचा डेटा आणि लक्ष्य केंद्रित जाहिरात या बद्दल मतभिन्नतेमुळे ॲक्टन यांनी कंपनी सोडण्याचा व विना-लाभ उपक्रमांवर त्यांचे प्रयत्न केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2018 मध्ये, ॲक्टन यांनी मॉक्सी मार्लिनस्पाइक यांच्या सह Signal Foundation सुरु करण्यासाठी स्वत:च्या संपत्तीतील $50 मिलियन गुंतवले. Signal Foundation ही, खाजगी संभाषण प्राप्य, सुरक्षित आणि सर्वव्यापी बनवण्यासाठी संस्थापनात्मक कार्य करण्यास समर्पित असणारी विनालाभ संस्था आहे.
WhatsApp व Signal Foundation ची स्थापना करण्यापूर्वी, ॲक्टन यांनी Apple, Yahoo, व Adobe सारख्या कंपन्यांत 25 वर्षापेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर बिल्डर म्हणून काम केले.
जय हे कझ्युमर टेक्नॉलॉजी मधील वरिष्ठ उत्पादन आणि इंजिनिअरिंग लिडरशीप भूमिकांची अत्याधिक पार्श्वभूमी सह असलेले प्रॉडक्ट बिल्डर आहेत. अगदी अलिकडेच, ते Twitter च्या ग्राहक आणि रेव्हेन्यू उत्पादने, लिडिंग इंजिनिरिंग, प्रॉडक्ट, डिझाइन, रिसर्च आणि डेटा सायन्सचे जनरल मॅनेजर पदावर होते. Twitter च्या पूर्वी, जय Facebook येथे होते. जिथे ते रिॅलिटि लॅब्ज AI असिस्टंटच्या डेव्हलपेमेंटचे प्रमुख आणि नंतर त्यांनी Signal आणि Instagram Direct येथे गोपनीयता, एकात्मता आणि सिस्टिम प्रॉडक्ट टिमचे प्रमुख म्हणून काम केले. जय हे Mozilla येथे प्रॉडक्टचे एसव्हिपी आणि मुख्य कार्यकारी अधिकार होते, जिथे त्यांनी त्यांच्या कालावधी दरम्यान Firefox च्या मुख्य रिलिजचे प्रमुख म्हणून काम केले आणि वेब प्लॅटफॉर्म साठी एक प्रचारक होते आणि लोकांना ऑनलाइन अधिक निवडी आणि नियंत्रण देण्यासाठी काम केले.
जय हे स्टार्ट-अप फाऊंडर देखील होते, आणि त्यांच्या करियरची सुरूवातीचा कालावधी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून आणि Fireflu Network (ज्याला Microsoft ने खरेदी केले) आणि Oracle येथे इंजिनिअरींग मॅनेजर म्हणून काम केले.
जय यांनी Yale कॉलेजमधून अप्लाईड मॅथेमॅटिक्स मध्ये बी.एस. घेतलेली आहे आणि ते असंख्य युनायटेड स्टेट पेटंट्स चे सह-संशोधक आहे.
कॅथेरिन माहेर या Wikimedica फाऊंडशेनचे माजी सीईओ आणि कार्यकारी संचालक आहेत, जे Wikipedia साठी जबाबदार आहेत. सध्या त्या ॲटलॅन्टिक कौन्सिल येथे बिगर-रहिवासी वरिष्ठ फेलो म्हणून काम करत आहेत, जिथे त्या टेक्नॉलॉजी, मानवाधिकार आणि लोकशाहीच्या एकत्रिकरणावर लक्ष केंद्रीत करणे हे त्यांचे काम आहे. Wikimedia पूर्वी, त्या डिजीटल राईट्स ऑर्गनायझेशन अॅक्सेस नाऊ साठी अॅडव्होकॅसी संचालक होत्या. माहेर या कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन च्या संघ सदस्य, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यंग ग्लोबल लिडर आणि ट्रूमन नॅशनल सिक्युरिटी प्रोजेक्ट येथे सुरक्षा फेलो आहेत. त्या सेंटर फॉर टेक्नॉलॉजी आणि डेमोक्रॉसी, कन्झ्युमर रिपोर्ट्स, डिजीटल पब्लिक लायब्ररी ऑफ अमेरिका, ॲडव्हेन्चर सायन्टिस्ट आणि System.com यांच्या संचालक मंडळावर आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बैरूत च्या विश्वस्त आहेत. त्या यु.एस. डिर्पाटमेंट ऑफ स्टेट फॉरेन अफेअर्स पॉलिसी बोर्डच्या नियुक्त सदस्या आहेत, जिथे त्या तंत्रज्ञान धोरणावर सेक्रेटरी ऑफ स्टेट यांना सल्ला देतात. त्यांनी कैरो, इजिप्त मधील अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ अरेबिक लॅग्वेज इन्स्टिट्यूट येथे अभ्यास केल्यानंतर आणि दमास्कस, सिरीया येथील Institut français d'études arabes de Damas (L'IFEAD) येथे अभ्यास केल्यानंतर, न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ आर्टस् आणि सायन्स मधून 2005 मध्ये मिड्ल इस्टर्न आणि इस्लामिक स्टडीजमध्ये स्नातक पदवी प्राप्त केली.
मेरेडिथ व्हिटाकेर या Signal च्या अध्यक्षा आणि Signal Foundation संचालक मंडळाच्या सदस्य आहेत.
त्यांना तंत्रज्ञान, स्पॅमिंग उद्योग, शैक्षणिक संस्था, आणि सरकार मध्ये काम करण्याचा 17 वर्षापेक्षा अधिक अनुभव आहे. Signal मध्ये अध्यक्ष म्हणून रुजू होण्यापूर्वी, त्या NYU येथे Minderoo संशोधन प्राध्यापक म्हणून होत्या, आणि त्यांनी सह-संस्थापना केलेल्या AI नाऊ संस्थेच्या फॅकल्टी डायरेक्टर म्हणून काम केले. त्यांचे संशोधन आणि विद्वतापूर्ण कार्याने वैश्विक AI धोरणाला आकार देण्यास आणि AI वरील सार्वजनिक कथांना व्यावसायिक पद्धतीवर पाळत ठेवण्यास सर्वोत्तम रितीने ओळखण्याकडे आणि आजच्या आधुनिक AI ला आवश्यक असलेल्या औद्योगिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करण्याकडे बदलण्यास मदत केली. NYU मध्ये काम करण्यापूर्वी, त्यांनी Google येथे एका दशकापेक्षा अधिक काळासाठी काम केले, जिथे त्यांनी उत्पादन आणि अभियांत्रिकी संघांचे नेतृत्व केले, Google च्या ओपन संशोधन गटाचे आणि एक वैश्विकदृष्ट्या वितरीत नेटवर्क मोजमापन प्लॅटफॉर्म, M-Lab जो जगाच्या ओपन डेटाचा इंटरनेट कामगिरीवरील सर्वात मोठा स्त्रोत आहे त्याची सह-संस्थापना केली. त्यांनी Google येथे संघटन करण्यास देखील मदत केली. त्या Google येथे कंपनीच्या AI आणि त्याच्या हानीबद्दलच्या अपुऱ्या संसाधनांच्या चिंता यांच्या विरोधात मागे हटवण्यात मुख्य संघटकांपैकी एक होत्या, आणि त्या Google Walkout च्या मध्यवर्ती संघटक होत्या. त्यांनी व्हाईट हाऊस, FCC आणि सिटी ऑफ न्यूयॉर्क, युरोपियन संसद, आणि अनेक इतर शासकीय आणि नागरी संस्था यांना, गोपनीयता, सुरक्षितता, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट धोरण आणि उपाययोजना यावर सल्ला दिला आहे. आणि त्यांनी अलिकडेच US फेडरल ट्रेड कमिशनवर AI च्या वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यकाल देखील पूर्ण केलेला आहे.
मॉक्सी मार्लिनस्पाइक हे Signal चे संस्थापक आहेत.